राजौरीत रुग्णालयास आग   

राजौरी/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) मंगळवारी अचानक आग लागली. या घटनेनंतर १५० हून अधिक रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले, अशी माहिती अधिकार्‍यांनी मंगळवारी दिली.राजौरीतील जीएमसीच्या तळघरात काल सकाळी अचानक आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, अशी माहिती अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे सहाय्यक संचालक हिमांशू गुप्ता यांनी दिली. 
 
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीनंतर रुग्णालय परिसरात आगीचे प्रचंड लोट दिसत होते. तर, सर्वत्र धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण शोधले जात आहे, असे राजौरीचे उपायुक्त अभिषेक शर्मा यांनी यांनी सांगितले. शर्मा यांनी रुग्णालयात भेट देतानाच पाहणी केली. तसेच, रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयातील ओपीडीसह अन्य सर्व सेवा तातडीने पूर्ववत करण्याबाबत आमचे प्राधान्य असेल, असेही शर्मा म्हणाले.
 

Related Articles